राजर्षि छ. शाहू महाराज यांनी वंचित समुहाकरिता केलेले कार्य
Abstract
राजर्षि शाहू महाराज हे एक समाजसुधारक आणि दूरदर्शी होते जे आपल्या लोकांच्या विकासासाठी आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या उन्नतीसाठी प्रेरित होते. त्यांचा समाजातील सर्व सदस्यांमध्ये समानतेवर दृढ विश्वास होता. त्यांच्या राजवटीत, त्यांनी समानतेला चालना देण्यासाठी जातीय भेदभाव व्यवस्थेत अनेक क्रांतिकारी योजना सुरू केल्या.
समाजातील सर्व स्तरातील लोकाची प्रगती व्हावी हा त्यांबा ध्यास होता जन्मजात गुन्हेगार ठरविण्यात आलेल्या फासेपारधी कंजारभाट, कुचकोरवी, माकडवाले, डोंबारी (कोल्हाटी), रामोशी, बेरड या भटक्या विमुक्तांच्या जीवनात स्थिरता यावी, गुन्हेगारी विश्वातून त्यांना बाहेर काढून प्रगतीपथावर आणण्यासाठी राजर्षि शाहू महाराजांनी करवीर राज्यामध्ये लोकोत्तर कार्य केलेले आहे. गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातीची हजेरी माफ करणे, निवाऱ्याची व्यवस्था करणे, रोजगार देणे, आरक्षणाचा लाभ देणे इ. समाज सुधारण विषयक कार्याची मांडणी प्रस्तुत शोध निबंधामध्ये करण्यात आलेली आहे.
गावगाड्याच्या परीघाबाहेर काही जमाती पिढ्यानपिढया, उपजीविकेसाठी भटकत राहिल्या. आपल्या चालीरीती, रुवी परंपरानुसार त्या स्वतंत्र व तटस्थपणे जगत राहिल्या त्यांचे उपरेपणाचे दुःख अस्पृश्यतेपेक्षा ही भयानक होते. इंग्रज सरकारने १८७१ मध्ये महाराष्ट्रातील तत्कालीन ४२ भटक्या जमातीपैकी १४ भटक्या जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरवून गुन्हेगार जमाती कायदा लागू केला. अशा परिस्थितीमध्ये राजर्षि शाहू महाराजांनी या गुन्हेगार ठरविण्यात आलेल्या जमातींना, माणसांत आणण्याचे अभूतपूर्व कार्य केले. त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विकासासाठी भरीव व लोकोत्तर कार्य केले.
१९५२ मध्ये भारत सरकारने गुन्हेगार जमाती कायदा रद्द केला. मात्र त्याच्या किती तरी पूर्वीच १९१८ मध्येच गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातींची हजेरी माफ करण्याचे व त्याना माणसात आणण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले.
१९८० साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापूर येथील सेटलमेंटधा तारांची कुपणे समारंभपूर्वक तोडली पण त्याच्या कितीतरी पूर्वीच १९०८ पासूनच या जमातीच्या स्थित्तेसाठी, त्यांच्या रोजगारांसाठी उदरनिर्वाहासाठी शाहू महाराजानी भरीच कार्य केले. १९६१ पासून महाराष्ट्र शासनाने, भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी एकत्रित ४ टक्के आरक्षण धोरण लागू केले. पण त्याच्या कितीतरी पूर्वीच १९०२ मध्ये मागासलेल्या जातीच्यासाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव देणारा क्रांतिकारक जाहिरनामा लागू केला. काही प्रमाणात स्थिर झालेल्या भटक्या विमुक्तांना ही त्याचा लाभ झाला एकंदरीत राजर्षि शाहू महाराजांनी भटक्या-विमुक्तांच्यासाठी लोकोत्तर व भरीव स्वरुपाचे कार्य केलेले आहे.